श्रीलंकेवर संक्रांत; भारताचा विजय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
थिरुवनंतपुरम – भारताने तिसऱ्या विजयासह ही सीरिज ३-० अशी खिशात टाकली. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी यावेळी दमदार शतकं लगावली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत चार विकेट्स मिळवले. भारताने ३१७ धावांनी यावेळी दणदणीत विजय मिळवला.
मोहम्मज सिराजने यावेळी श्रीलंकेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. एकामागून एक सिराजने श्रीलंकेला चार धक्के दिले आणि त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर करुणारत्नेला धावचीत करण्यातही त्याने मोठा वाटा उचलला. त्यामुळे श्रीलंकेचा अर्धा संघ गारद करण्यात सिराजचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर काही काळासाठी सिराजला विश्रांती देण्यात आली. पण त्यावेळी कुलदीप यादवने भेद मारा केला आणि बळी मिळवत पुन्हा एकदा श्रीलंकेला धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने दुनिथला बाद करत श्रीलंकेला आठवा धक्का दिला.
शुभनल गिल आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज शतकं झळकावली व त्यामुळेच भारताला ३९० धावांचा डोंगर उभारता आला. गिलने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावरही गिलने आपली फटकेबाजी थांबवली नाही. गिल एकामागून एक फटकेबाजी करत गेला आणि त्याने आपले दमदार शतक झळकावले. गिलला यावेळी द्विशतक पूर्ण करण्याची चांगली संधी होती, पण ही संधी मात्र त्याने गमावली. भारताला गिलच्या रुपात दुसरा धक्का बसला. गिलने यावेळी ९७ चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ११६ धावांची खेळी साकारली. गिला बाद झाला, त्यानंतर कोहलीची तुफानी फटकेबाजी सुरु झाली. कोहलीचे हे वनडेमधील ४६ वे शतक ठरले. त्याचबरोबर कोहलीने यावेळी सचिन तेंडुलकरचा मायदेशातील २० वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला. कोहलीने यावेळी ११० चेंडूंत १३ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद १६६ धावांची खेळी साकारली. अखेरच्या काही षटकांत लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.