झोपडपट्टीतील सुनिलसाठी डॉ. गरूड बनले देवदुत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
वाकोद – आपल्या पेशाला जागत पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पीटलचे संचालक डॉ.सागर गरूड यांनी पहुर येथील सुनिल चव्हाण या युवकांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यंमातून यशस्वी मोफत शस्त्रक्रीया करून सुनिलच्या जगण्याला नविन दिशा दिली.
सविस्तर वृत असे सुनिल गोरख चव्हाण हा आपल्या कुंटुबासमेवेत पहुर-पाचोरा रोडवरील पहुर येथील पावर हाऊस समोर पालाच्या झोपडीत वास्तव करतात.घरात सर्व अशिक्षित असल्याने वडिल व सुनिल गावो गावी भटकंती करून भिक्षा मागून आपलं कुटुंब चालवतात . हे करीत असतांना शहादा येथे काही दिवसापुर्वी सुनिलचा मोटारसायकलवर अपघात झाला. शहादा येथे प्राथमिक उपचार करून पहुर येथे आले. पंरतू पायाच्यां वेदना कमी होत नसल्याने दोन तीन खाजगी हॉस्पीटल मधून औषध उपचार केले पंरतू कुठलाही फरक न पडल्याने त्यांनी पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पीटल गाठून डॉ. सागर गरूड याची भेट घेऊन कुंटुंबाबद्दल सर्व माहिती सांगितली व पुढील उपचार कसाही करून द्या हि विनती केली.
सुनिलच्या काही महंत्वाच्या तपासण्या केल्या नंतर त्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल हा सल्ला दिला व महात्मा फुले जन आरोग्य योजने अर्तगंत मोफत शस्त्रक्रिया करून सुनिलला जगण्यासाठी नविन जीवदान दिल्याने सर्व स्तरातून डॉ सागर गरूड यांचे अभिनन्दन होत आहे. रूग्णसेवा करून प्राण वाचवणे हे डॉक्टरांचे कर्तव्य ही जाण ठेवली तर डॉक्टर देवदुत बनतो हा प्रत्यय या घटनेतून दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.