इमारतीची लिफ्ट कोसळून 7 जणांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

अचानक लिफ्ट कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, बालकुम, ठाणे, (प.) याठिकाणी घडली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. यावेळी स्थानिकांनी धावाधाव करत अग्नीशमन दलाला माहिती कळविली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागानाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतामधील सातही जण कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

नेमकं काय झालं होतं ?

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. यातील एका कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून दुसऱ्या कामगाराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेत सुनिल कुमार दास (वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर महेंद्र चौपाल (३२ ), रुपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७), मिथलेश (३५) आणि कारिदास (३८) अशी मृतांची नावे आहेत. मृतामधील सहाव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्टमध्ये कोसळली होती. अग्निशमन दलाचे जवान ०१ – इमर्जन्सी टेंडर व ०७ – रुग्णावाहिकांसह घटनास्थळी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.