राजस्थानमधील जैसलमेरजवळ तेजस विमान कोसळले (पहा व्हिडीओ )

0

जैसलमेर – राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी एका विमानाचा अपघात झाला. जैसलमेरच्या वाळवंटी भागात हा अपघात झाला असून अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. क्रॅश झालेले विमान पोखरणमध्ये सुरू असलेल्या ‘भारत शक्ती’ या तिन्ही सैन्य दलाच्या सरावात सहभागी तेजस असल्याचं सांगण्यात येत आहे.

या अपघाताचा तपशीलही IAF ने X वर शेअर केला आहे. “भारतीय हवाई दलाच्या एका तेजस विमानाचा आज जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग सोर्टी दरम्यान अपघात झाला. पायलट सुखरूप बाहेर पडला. चौकशीसाठी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. तेजस विमानाचा हा पहिला अपघात आहे, जे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटर (ARDC) च्या सहकार्याने एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने डिझाइन केलेले स्वदेशी बनावटीचे हलके मल्टी-रोल लढाऊ विमान आहे.

दरम्यान राजस्थानमधील पोखरणच्या वाळवंट परिसरात मंगळवारी दुपारी ‘भारत शक्ती’ या महासरावाला सुरुवात झाली. या अंतर्गत तिन्ही सैन्याच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांचे सामर्थ्य दाखवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या ‘भारत शक्ती’ सरावाचे निरीक्षण केले. सुमारे ५० मिनिटे स्वदेशी संरक्षण क्षमतेचे समन्वित प्रदर्शन होते. यावेळी देशातील सर्वोच्च लष्करी अधिकारीही उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.