तंत्रज्ञानामुळे जीवन झाले सुखकर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

तंत्रज्ञान मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनलाय. आधुनिक युगात बदलत्या वेळेनुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. तंत्रज्ञान म्हणजे फक्त  मोबाईल, इंटरनेट, गॅझेट्स, संगणक इत्यादी नाही. तर माणसाचे काम सोपे करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तंत्रज्ञान असे म्हणतात.

तंत्रज्ञान हे  मानवाने बनवलेले तंत्र, उपकरणे आणि यंत्रे यांचा अभ्यास आणि बदल होय. तंत्रज्ञान मानवाला त्यांच्या जीवनात उपस्थित असलेल्या भौतिक घटकांचा अभ्यास आणि विकास करण्यासाठी उपयोगी ठरते.

मानवी जीवनात तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे (The importance of technology)

तंत्रज्ञान हे प्रत्यक्षअप्रत्यक्षपणे विज्ञानाशी संबंधित असते. तसेच माणसाच्या विकासामागे विज्ञानाची फार मोठी भूमिका आहे. विज्ञान ही एक मानवाची असामान्य निर्मिती आहे. असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही.

जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मताच हवा, पाणी, आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी एक घट्ट नाते जोडले जाते. दैनंदिन जीवनात अगदी सकाळी उठल्यापासूनची सुरुवात ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी आपल्याला विज्ञानाचं उपयोगी पडत असते.

देशाची प्रगती ही विज्ञानाच्या वाढत्या वापरावर अवलंबून आहे. आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला आहे तेथे तेथे विकास घडून आला आहे. म्हणूनच तर आज मानवाच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे.

तसेच विज्ञानामुळे मानवी जीवनमान उंचावलेले आपल्याला पाहायला मिळते. आज विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने होत आहे. विविध संशोधनातूनच नवीन उदयास आलेली तत्वे, सिद्धांत, अनुमानांचा उपयोग तंत्रज्ञानाचा आधार बनून  विज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात वेळोवेळी सहाय्यक करत आहे.

 तंत्रज्ञानाचा प्रभाव  (The impact of technology)

आदिम काळापासून तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाताय. प्राण्यांच्या पिंजऱ्यापासून ते विविध उपकरणे आणि चाकांपर्यंतचा प्रवास हा तंत्रज्ञानामुळे शक्य झालाय.

दगडापासून शस्त्रे बनवण्यापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानापर्यंत, मानवाने प्राचीन काळापासून आजपर्यंत तंत्रज्ञानात लाखो शोध लावले आहेत आणि भविष्यातही तंत्रज्ञानात आणखी चांगले शोध आपण मानवच लावणार आहेत, यात शंका नाही.

तंत्रज्ञानाच्या फायद्यासह तोटे देखील (Advantages and disadvantages of technology)

तंत्रज्ञान हे वरदान आहे तसेच शाप देखील आहे. तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन सुखकर आणि सोपं झालं आहे, त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो आणि आपलं कामही अगदी अचूक बनतं पण तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत.

तंत्रज्ञानाच्या तोट्याचे उदाहरण पाहिले तर, आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे अनेक लोक नैराश्याचे बळी ठरले आहेत, परंतु तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांसाठी आपण तंत्रज्ञानाला दोष देऊ शकत नाही कारण तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते तंत्रज्ञानाच्या बळावर होते.

आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, त्यामुळे माणसाचा बराच वेळ वाचतो आणि तंत्रज्ञानामुळे जगणेही खूप सोपे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.