टेक्नोवेशन स्पर्धेत नाशिकचे के के वाघ अभियांत्रिकी विजेते तर गोदावरी अभियांत्रिकी उपविजेता

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयईईई मुबंईच्या सयुक्‍त विद्यमाने आयोजित टेक्नोवेशन २३ प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनात नाशिकचे के के वाघ अभियांत्रिकी विजेत तर गोदावरी अभियांत्रीकी महाविद्यालय उपविजेते ठरले.

टेक्नोवेशन हे राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट एक्सपो आहे. त्यामध्ये व्हीएलएसआय, रोबोटिक्स, सायन्सेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या थीम अंतर्भूत असतात. राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन हे नवीन पिढीच्या तल्लख मनात सर्जनशीलता आणि कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न करते.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, (चेअरमन स्टुडन्ट ऍक्टिव्हिटीज कमिटी, खएएए बॉम्बे सेक्शन)चे प्रा. दत्तात्रेय सावंत व (झीेक्षशलीं र्एींरर्श्रीरीेीं) डॉ.प्रमोद भिडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) प्रा. हेमंत इंगळे (ब्रांच कौन्सेलर, खएएए) प्रा. शफिकूर रहमान अन्सारी(समन्वयक,खएएए ) प्रा. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) डॉ. नितीन भोळे, प्रा.तुषार कोळी प्रा. महेश एच पाटील, प्रा. निलेश वाणी यांच्या उपस्थीतीत उदघाटन व समारोप करण्यात आला.

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये यावर्षी टेक्नोव्हेशन २०२३ चे खएएए अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात ३४ प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, १२५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. टेक्नोव्हेशन २०२३ चे विजेते प्रथम क्रमांक के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिकच्या प्रसाद राठोड पूर्वा सोनवणे पियुष बर्‍हाटे यांच्या कॅपसिटर व्होल्टेज सेंन्सर या प्रकल्पाने पटकावला तर व्दीतीय क्रमांक विजेते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे देवयानी फालक सर्वेश चौधरी वैष्णव चौधरी यांच्या स्मार्ट सिक्युरिटी पोल या प्रकल्पास मिळाला. तृतीय क्रमांक चांदवड येथिल एस एन जे बी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दिशा भामरे पल्लवी बच्छाव रोशन निकम यांच्या आय ओ टी बेस एनर्जी कंझमशन माँटेरिंग वीथ स्मार्ट आटोमेशन तर स्पेशल कॅटगरी मुली मध्ये गोदावरी अभियांत्रिकीच्या आदिती खाचणे स्वाती सरोदे प्रगती सरोदे यांच्या फार्मसी मॅनेजमेंट सिस्टीम प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेत विजयी स्पर्धकांची पुढील फेरी कोपरगाव या ठिकाणी १५ एप्रिल रोजी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ठेवण्यात आली आहे.मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करतांना प्रास्ताविकात प्रा. हेमंत इंगळे यांनी केले त्यामध्ये त्यांनी खएएए च्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली व आलेल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या सहभागाबद्दल अभिनंदन केले प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी टेक्नोव्हेशन बद्दल सांगताना खएएए शी संलग्नित असल्या कारणामुळे सदर कार्यक्रमाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करून स्वतःचे नाविन्य जगतासमोर मांडण्यासाठी हा उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे असेही त्यांनी सांगितले. डॉ. दत्तात्रेय सावंत यांनी त्यांच्या मार्गदर्शनात  बद्दल माहिती सांगताना प्रथमच टेक्नोव्हेशन कॉम्पिटिशन व प्रदर्शन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राबविण्यात आली त्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे या स्पर्धेत वेगवेगळ्या विभागातून स्पर्धक आल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले व सुंदर आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे व कार्यकारिणीचे कौतुक केले.तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी खएएए माध्यमातून वेगवेगळे वर्कशॉप, गेस्ट लेक्चर्स, डढढझ, ऋऊझ भविष्यात राबविण्यात येतील असे सुतवाच त्यांनी केले.डॉ.प्रमोद भिडे यांनी या कार्यक्रमांमध्ये विचार व्यक्त करताना स्पर्धकांना सादरीकरण बद्दल मार्गदर्शन केले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांनी अंतर्गत होणार्‍या या कार्यक्रमाचा बहुमान गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाला याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. अशाप्रकारे वेगवेगळे इव्हेंट्स निरंतर सुरू राहतील याचबरोबर विद्यार्थ्यांना संबोधन करताना त्यांनी विद्यार्थ्यांची क्रयशक्ती अशा प्रकारच्या कार्यक्रमातून वाढीस लागते असे सांगितले व वेगवेगळ्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजतात. टेक्नोव्हेशन या कार्यक्रमांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात ३४ प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यासाठी १२५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांची पुढील फेरी कोपरगाव या ठिकाणी १५ एप्रिल रोजी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ठेवण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचा चे नियोजन प्रा.हेमंत इंगळे व प्रा. शकीकूर रहमान अन्सारी यांनी पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कमिटीची नेमणूक करण्यात आली होती,तसेच स्टुडन्ट कौन्सिलचे विदयार्थी यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी टिकले व गायत्री माळी या विद्यार्थिनींने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.शफिकुर रहमान अन्सारी यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.