महापालिकेची कारवाई, या तारखेपर्यंत भरणा न केल्यास जप्ती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महापालिकेतर्फे थकबाकीदार मिळकतधारकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय शस्ती योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ८९ कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. एकूण १२ पथकांनी धडक कारवाई करत आतापर्यंत एकूण १८१ नळ संयोजन बंद केले असून, एकूण २०१ मालमत्ताधारकांना जप्तीची अधिपत्रे बजावली आहेत. ज्या थकबाकी मिळकतधारकांना जप्तीची अधीपत्र बजावण्यात आलेली आहेत, त्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपर्यंत थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल व अशा मालमत्तांवर बोजा चढवण्याची कारवाई महापालिका अधिनियम अंतर्गत करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

मालमत्ता थकबाकीधारकांनी या शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे अवाहन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व उपायुक्त (महसूल) गणेश चाटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.