तप सेवा सुमिरन समिती जळगाव व इंटरनॅशनल अशोशियेशन फॉर सायंटिफिक स्प्रीचुयालिझम मेरठ तर्फे जळगावात शिबीर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्या प्रती बेदरकार होत असून त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागत आहे. जसे मधुमेह, उच्च रक्त दाब, थायरॉईड, स्थूलता, कंबर दुखी, गुडघे दुखी, चर्म रोग केस गळणे, कॅन्सर, किडनी चे रोग, मानसिक तणाव, डिप्रेशन इत्यादी. या पैकी काही रोग एकदा लागले तर आयुष्य भर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी औषधे घ्यावी लागतात व त्यांच्या साईड इफेक्टस् मुळे आपण अजून नवीन रोगांनी ग्रस्त होत असतो व मृत्यू पर्यंत या रोगां पासून बाहेर पडू शकत नाही. या सर्व रोगांचे निवारण फक्त आहार परिवर्तन करून कसे सहज करता येईल व नवीन रोगांपासून बचाव कसा करता येईल या साठी जळगाव तप सेवा सुमिरन समिती च्या वतीने 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2022 या 7 दिवसांच्या कालावधी साठी आरोग्य व आध्यात्म विकास शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर शिरसोली रोड वर असलेल्या श्री कृष्ण लॉन येथे सकाळी 9 ते 1 व दुपारी 4 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे.

मेरठ येथील इंटरनॅशनल अशोशियेशन फॉर सायंटिफिक स्प्रीचुयालिझम (IASS) या संस्थेदवारे राम चरित मानस या ग्रंथावर शास्त्रोक्त पद्धतीने डॉ. गोपाल शास्त्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.