जलतरण तलावात पोहताना १७ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

0

चाळीसगाव :- पोहण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय तरूणाचा पोहत असताना अचानपणे मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील चिंचखेडे येथील अमन मनोहर निकम (वय १७) हा तरूण शहरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरातील आण्णाभाऊ साठे जलतरण तलाव येथे तो पोहण्यासाठी गेला होता. उन्हातून आल्यानंतर कपडे काढून अमर याने ७ फुट पाण्यात उडी मारली. अमनला पोहोता येत होते. परंतु, उन्हातून थेट पाण्यात गेल्यामुळे अचानक शारिरीक बदल होवून अमर हा पाण्यातून वर आलाच नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान, तत्काळ संरक्षकांनी अमर निकमला वर काढून शहरातील डॉ. राहूल वाघ यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.