देशात बँक फसवणुकीची 100 हून अधिक प्रकरणे प्रलंबित- सुशील मोदी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली; भाजपचे सदस्य सुशील मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. सुशील मोदी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार बँक फसवणूक प्रकरणांचा तपास सीबीआयला करू देत नाही. केंद्र सरकारने या प्रश्नावर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी केली.

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये नवा इतिहास रचणार, विधानसभेला लाभणार पहिल्या महिला सभापती राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भाजपचे सदस्य सुशील मोदी म्हणाले की, देशात बँक फसवणुकीची (bank fraud cases) 100 हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

एस बँकेची पाच प्रकरणे दीड वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांची रक्कम 3,364 कोटी रुपये आहे. एस बँकेने त्यांच्या चौकशीची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 3,046 कोटी रुपयांची प्रकरणे प्रलंबित आहेत.

एकट्या मुंबईत १३,००० कोटींहून अधिक बँक फसवणूक (bank fraud cases) प्रकरणे प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्र सरकार सीबीआयला तपास करू देत नाही, असा दावा त्यांनी केला. बँक फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी करता यावी यासाठी सुशील मोदी यांनी सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

भाजपमध्ये परिवारवादाचे राजकारण चालणार नाही : पीएम मोदींनी स्वपक्षीय खासदारांना सुनावले

सुशील मोदींनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, त्याला अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी परवानगी दिली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.