सनी देओलवर फसवणुकीचा आरोप, निर्मात्याने केली तक्रार दाखल…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बॉलिवूड अभिनेता सनी देओलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘गदर 2’च्या तारा सिंगवर फसवणूक आणि खोटे बोलल्याचा आरोप आहे. बॉलीवूड निर्माता सौरव गुप्ता याने अभिनेत्यावर फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरीचे धक्कादायक आरोप केले आहेत आणि इतकेच नाही तर त्याने आपल्या वचनांची पूर्तता न केल्याचा आरोप देखील केला आहे. सनडाउन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सौरव गुप्ता यांनी दावा केला आहे की 2016 मध्ये त्याने सनी देओलसोबत त्याच्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी 4 कोटी रुपयांचा करार केला होता. कोट्यवधी रुपयांच्या या डीलमधील बदलांबाबत आता एक नवीन अपडेट समोर आले आहे.
सनी देओल वर निर्मात्याचा आरोप
निर्माता सौरव गुप्ता यांनी सांगितले की, 2016 मध्ये सनी देओलने त्याचा एक चित्रपट साइन केला होता आणि त्यासाठी अभिनेत्याने त्याच्याकडून 4 कोटी रुपये घेतले होते. फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरी सारखे आरोप करताना सौरवने खुलासा केला आहे की त्याने सनी देओलला 1 कोटी ॲडव्हान्स दिले होते तर 2.55 कोटी अजूनही अभिनेत्याकडे आहेत. पण तरीही सनी देओलने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले नाही आणि त्याऐवजी ‘पोस्टर बॉईज’ (2017) चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.
सनी देओलने करार बदलला
सौरव गुप्ता पुढे म्हणाले की, 2023 मध्ये सनी देओलने त्याच्या कंपनीसोबत बनावट करार केला होता. चित्रपट निर्मात्याने आरोप केला की, ‘जेव्हा आम्ही करार वाचला तेव्हा सनीने मधले पान बदलले आणि फीची रक्कम 4 कोटींवरून 8 कोटी रुपये केली. एवढेच नाही तर, नफाही घटवून दोन कोटी रुपयांवर केला. निर्मात्याने सनी देओलविरुद्धच्या करारनाम्यात अचानक बदल करून फीची रक्कम 4 वरून 8 कोटी रुपये केल्याचा. आणि बनवत कागदपत्र बनवून फसवणूक केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुनील दर्शननेही सनीवर आरोप केले
सौरव गुप्ता नंतर चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनीही सनी देओलवर आरोप केले आहेत. तो म्हणाला की ‘गदर 2’ अभिनेत्याने त्याच्या ‘अजय’ चित्रपटाचे हक्क परदेशात वितरणासाठी मागितले होते आणि केवळ अर्धी रक्कम दिली होती. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता सनी देओलने अद्याप या दोन्ही प्रकरणांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य शेअर केलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.