मद्यधुंद अवस्थेत सनी देओल फिरतोय मुंबईच्या रस्त्यांवर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्याचा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होण्यास फार अवधी लागत नाही. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेता सनी देओलचा आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओलची अवस्था पाहून चाहत्यांना काळजी वाटत आहे. मुंबईतील जुहू सर्कल परिसरात तो चक्क मद्यधुंद अवस्थेत पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध तो अडखळत चालतोय आणि अचानक एक रिक्षाचालक त्याच्या मदतीला येतो. हा रिक्षाचालक सनीला त्याच्या रिक्षामध्ये बसवत असल्याचे दिसत आहे.सध्या सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

 

व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?
सानी देवळाच्या या व्हायरल व्हिडिओमागचं नेमकं सत्य काय आहे?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सनी त्याच्या आगामी ‘सफर’ या चित्रपटासाठी विविध शहरांमध्ये शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याच्या शुटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.