धक्कादायक; नवी मुंबईतून ४८ तासात एवढ्या मुलांचे अपहरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मूळ गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहे. मुलांचं अपहरण होत असल्याची या पालकांची तक्रार आहे. तर, अचानक होत असलेल्या या प्रकारामुळे पोलिसही हादरून गेले आहे.

नवी मुंबई शहरातून मागील ४८ तासात ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहे. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहे. गायब झालेली ही ६ मुले १२ ते १५ वयोगटाची आहे. बेपत्ता मुलांचे अपहरण झाल्याची या पालकांची तक्रार आहे. या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.

भीतीचे वातावरण
ही सर्व मुले ३ आणि ४ डिसेंबर रोजी गायब झाले आहे. या सहा मुलांपैकी एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा १२ वर्षाचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता. नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली. कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाले आहेत. रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता. तिथून तो गायब झाला आहे. मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरले आहेत. मुलांचं अपहरण करून त्यांचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अशी शंका पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुलं अशी अचानक बेपत्ता होत असल्याने नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.