तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शिरपूर तालुक्यात तरुणाची आत्महत्या

0
लोकशाही न्युज नेटवर्क 
धुळे ; तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शिरपूर तालुक्यात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे . नदीच्या पुलावर बेवारस आढळलेल्या दुचाकीमुळे हा प्रकार लक्षात आला.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे नजीक तापी नदीच्या पुलावर जीजे 05 एस एक्स 7157 क्रमांकाची मोटार सायकल बेवारस पणे आढळून आली. त्यामुळे या दुचाकीवरील तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय होता. ही माहिती नरडाणा पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार नरडाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

अज्ञात तरुण जि. जे 05 एस, एक्स 7157 क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या स्कुटीवरून सावळदे तापी नदी पुलावर आला व तेथून त्याने तापी नदीत उडी घेतली असा अंदाज काढून पोलिसांनी तपास सुरू केला. नरडाणा पोलीसांनी सदर स्कुटी ताब्यात घेतली होती.  स्कुटी शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील छोटु गोरख कोळी या 33 वर्षीय तरुणाची असल्याचे कळाल्यानंतर ही माहिती त्याच्या परिवाराला देऊन माहिती घेण्यात आली.

पथकाने दुचाकीस्वाराचा सावळदे नजीक तापी नदीत शोध सुरु केला. आज सकाळच्या सुमारास छोटु गोरख कोळी या तरुणाचा तापीनदीत मृतदेह मिळून आला. मच्छीमार करणाऱ्या बोटीतून मृतदेह बाहेर काढत कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. मयत छोटु कोळी याच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.