म.रा. विज कर्मचारी ,अभियंते , अधिकारी संघर्ष समिती व कंत्राटी कामगार संघटना- कृती समितीद्वारे संपाचे आयोज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:-म. रा. वीज कर्मचारी , अभियंते , अधिकारी संघर्ष समिती व कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने दि. २८ व २९ मार्च -२०२२ रोजी संप १०० % यशस्वी करण्याकरिता ३९ संघटना एकवटल्या .आहेत .  सर्व वीज कामगार संघटनांच्या सभासदांना आवाहन करण्यात येते कि, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती मधील खाजगीकरण व प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात पुकारलेल्या दि: 28 व 29 मार्च 2022 रोजी च्या संपामध्ये आपल्या संघटनेच्या सर्व नियमीत कामगार , उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक व  कंत्राटी व बाह्यस्त्रोत  कामगार इ. सभासदांनी पूर्ण क्षमतेने उतरून कोणत्याही दबावाला , गैरसमजुतीला  व अफवांना बळी न पडता संप यशस्वी करावयाचा आहे.

कारण कंपनी टिकली तरच आपण  सर्व कामगार म्हणून राहणार आहोत . तरी प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वाभिमानाने १०० % संपात सहभागी होऊन आपली वज्रमुट निश्चीतच दाखवून दया .

आपणा प्रत्येकाला वैयक्तिक निरोप देणे शक्य नसल्याने हा संदेशच अंतिम समजून आपापल्या सर्व परिमंडत /  मंडल/विभागीय/उपविभागीय /शाखा / उपकेंद्रामधील सर्व कामगारांना व आपल्या संघर्ष कृती समितीमधील सहयोगी संघटनेमधील  सभासदांनी सहभागी व्हावे.

Leave A Reply

Your email address will not be published.