Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदची हाक; सरकारी बँका दोन दिवस बंद राहणार !
    ताज्या बातम्या

    केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदची हाक; सरकारी बँका दोन दिवस बंद राहणार !

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 27, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    देशव्यापी संपाचा मोठा परिणाम हा बँकिंग सेवांवर होऊ शकेल.सेंट्रल ट्रेड युनियनने केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवस भारत बंदची हाक दिली आहे. बँक युनियनने देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारी बँकांचे खासगीकरण आणि बँकिंग कायदे अधिनियम 2021 धोरणांच्या विरोधात हे आंदोलन केले जाईल असे युनियनकडून सांगण्यात येत आहे.

    28-29 मार्चला होणाऱ्या देशव्यापी संपाचा मोठा परिणाम हा बँकिंग सेवांवर होऊ शकेल असे स्टेट बँकेकडून खातेधारकांना सुचित करण्यात आले आहे. सेंट्रल ट्रेड युनियनच्या जॅाईंट फोरमकडून सोमवारी आणि मंगळवारी सरकारच्या धोरणांविषयी आक्रमक भूमिका घेत हा संप पुकारण्यात आला आहे.

    ऑल इंडिया बँक एम्प्लॅाईज असोसिएशनने ( All India Bank Employees Associatiion) या संपाला पाठिंबा दिलेला आहे. सर्व संघटनांची 22 मार्च रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करून या दोन दिवसीय संपाची घोषणा करण्यात आली.

    केंद्र सरकारचे कर्मचारी विरोधी, किसान विरोधी, जनता विरोधी आणि राष्ट्र विरोधी असणाऱ्या धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे अशी माहीती कर्मचारी संघटनांनी दिली. बँक युनियन सरकारी बँकाच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध तीव्र भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने 2021च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी बँकाचे खासगीकरण करत असल्याची घोषणा केली.

    बँकांमध्ये असे कित्येक कर्मचारी आहेत जे निवृत्त होणार आहेत, जर ते या संपात सहभागी होत असतील तर त्यांच्या सुविधांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, विमा आणि डाक या सर्व विभागांचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि सुरक्षा विभागाशी संबंधीत कर्मचारी देखील या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता तयारीत आहेत.

    Bank strick Indian strick
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif