वरखेड येथील 27 वर्षीय तरुणाची गळफास आत्महत्या

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील वरखेड येथील 27 वर्षीय नवनाथ सीताराम गोलाईत या तरुणाने गळफास घेतल्याची घटना दि. 27 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत भडगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवनाथ सीताराम गोलाईत याने विशाल पाटील यांच्या शेताच्या बांधाला लिंबाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेतला. यावेळी नागरिकांनी त्यास भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवनाथ गोलाईत यांना मयत घोषित केले.

विशाल देवसिंग पाटील रा. वरखेड यांच्या खबरीवरून भडगाव पोलीसात 76/2022 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पो. ना. किरण पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.