गोंडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

निष्काम कर्मयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने पावन सनिध्यात श्री क्षेत्र गोंडगाव येथे राष्ट्र निर्माण धर्म सोहळा संपन्न झाला.

आज पर्यंतच्या इतिहासात फक्त पुरुषच जप, तप, अनुष्ठान, ध्वजारोहण करत होते. परंतु आता बाबाजींनी हा भाग महिला वर्गासाठी खुला करून नमूद केले की, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आदि सारख्या थोर आदर्श महिला बनाल्या पाहिजेत. आपण महिलांना देवी स्वरुप मानतो. तो आदर्श घ्यावा. त्या निमित्ताने आरंभाचे पहिले ध्वजारोहण यंदा प्रथमच नारीशक्ति रूपाने स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे कृपा आशीर्वादाने भडगांव पो. स्टे. दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

तदनंतर अनुक्रमे आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, युवा नेते अमोल शिंदे, माजी सैनिक समाधान पाटील, अशोक परदेशी, मेडिकल असो.अध्यक्ष सुरेश भंडारी आदि मान्यवरांच्या हस्ते बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने डॉ. गणेश अहिरे, स्वाती अहिरे, सह समस्त जय बाबाजी भक्त परिवार आणि आयोजन सोहळा समिती, धुळे जळगांव जिल्हा भाविक भक्त परिवार यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या भक्ति भाव रूपाने समारंभ संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.