एरंडोल येथे बदनामीच्या भीतीपोटी युवतीने गळफास लावून केली आत्महत्या

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एरंडोल येथे घराच्या पाठीमागे राहणाऱ्या आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीपोटी येथील भवानी नगरातील युवतीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी अमोल समाधान निकम, रामसिंग माना निकम, उषाबाई समाधान निकम, आनंद समाधान निकम, समाधान रामसिंग निकम हे सर्व राहणार भवानीनगर एरंडोल यांच्यावर एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दुर्गाबाई विठ्ठल शिंदे या भवानीनगर येथे राहत असून त्यांच्या घराच्या मागे निकम परिवार राहतो, 23 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपींनी रात्री अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली असता जमलेल्या लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. शिंदे परीवार घरात गेल्यावरही आरोपींचे शिव्या देणे सुरू होते, 24 तारखेला सकाळी विठ्ठल शिंदे हे नेहमीप्रमाणे मोहाडी तालुका अमळनेर येथे विहीर खोदण्याच्या कामासाठी निघून गेले व दुर्गाबाई ह्या जवळ असलेल्या नाल्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या, त्यावेळी त्यांच्या मुलीने घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी अमोल समाधान निकम, रामसिंग माना निकम, उषाबाई समाधान निकम, आनंद समाधान निकम, समाधान रामसिंग निकम हे सर्व राहणार भवानीनगर एरंडोल यांच्यावर एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार सुनील लोहार व हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.