थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अनियमित जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्यामुळे थायरॉईडची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकजण या आजाराने ग्रासलेले आहे. थायरॉईडचे २ प्रकार आहे. हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड. दोन्ही परिस्थिती या गंभीर ठरू शकतात. जर तुम्ही थायरॉईडचे रुग्ण असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही हे पदार्थ खाताना काळजी घ्यावी.

सोया किंवा सोया प्रॉडक्ट
थायरॉईडच्या रुग्णांनी सोया किंवा सोया प्रॉडक्ट खाणे टाळावे. थायरॉईड असलेल्या रुग्णांनी आहारात सोया पदार्थांचाही समावेश करू नये. सोयाबीनमध्ये फायटोस्ट्रोजेन आढळते, जे थायरॉईडच्या रुग्णांसाठी धोकादायक मानले जाते. तेव्हा थायरॉईडच्या रुग्णांनी कमी प्रमाणात सोयाबीनचे सेवन करावे, तसेच यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

क्रूसिफेरस भाजी
थायरॉईडच्या रुग्णांनी केल, ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी आणि पालक यांचे सेवन करू नये. त्यात गोइट्रोजेन्स देखील आढळतात जे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणतात.

साखर
थायरॉईडच्या रुग्णांनी साखरेचे जास्त सेवन टाळावे. यामुळे शरीरात जळजळ होते आणि थायरॉईड हार्मोन्स नीट बाहेर पडत नाही. त्याच वेळी पचनाची क्रिया देखील संथ होते. ही थायरॉईड रुग्णांसाठी चिंतेची बाब आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.