धक्कादायक; युवकाची स्वतःला श्रद्धांजली देत आत्महत्या…

0

 

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाळवा येथील एका फळ विक्रीचे काम करणाऱ्या युवकाने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट टाकत मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. ही घटना बाराबिगा वसाहतीत आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश सचिन फाळके तथा मालेवाडीकर (२४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलीसांत नोंद करण्यात आली आहे. योगेश याने आत्महत्येपुर्वी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीसह नोटांच्या बंडलाचे फोटो डी.पी वर सेव्ह केले होते. त्याच्या काही मित्रांनी तो डी.पी. पाहिल्यावर सकाळी त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर योगेशच्या आत्महत्येचे प्रकरण उशाद्कीस आले.

Leave A Reply

Your email address will not be published.