जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, झिरो अवर फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे छात्र संसद ८ ते १० एप्रिल २०२२ दरम्यान रुस्तमजी इंटरनॅशन स्कुलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.
छात्र संसद ही युवा चळवळ असून याद्वारे देशाच्या युवाशक्तीला जागृत करण्याचे काम करते देशाच्या ज्वलंत विषयावर चर्चा करून तरुणांना या विषयावर विचार करण्यास व भाष्य करण्यास भाग पाडणे व युवकांनी राजकारणाबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी व त्यांचे बौद्धिक चातुर्य कामात आणण्यासाठी छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यपक व सचिव विराफ पेसूना यांनी दिली.
दिनांक ८ एप्रैल २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान उद्घाटन सोहळा पार पाडण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना लोकसभा, राज्यसभा व प्रेस या तीन गटात विभागले जाईल. त्यानंतर त्यांना सत्ताधारी गटाचे किंवा विपक्षाचे प्रतिनिधी म्हणून नेमले जाईल.
प्रतिनिधींना एका विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक विषयावर चर्चा करून निकषांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या बाजूने मसुदा तयार केला जाईल. हा मसुदा राज्यातील मंत्रालयात सादर केला जाईल. विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची सोय रुस्तमजी इंटरनेशनल स्कूलतर्फे केली जाणार आहे. तिसऱ्या दिवशी दि. १० एप्रिल २०२२ ला दिवसभर चर्चेनंतर संध्याकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान समारोप समारंभ आयोजित केलेला आहे. या समारंभात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
छात्र संसदेद्वारे जळगाव शहरातील व जिल्ह्यातील तरुणांना एक मोलाची संधी मिळाली आहे. या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्याची संधी प्राप्त होणार आहे. छात्र संसद २०२२, जळगाव सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले असून केवळ १००० रुपयांच्या शुल्कावर विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. यात तीस विशेष विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे असे देखील सांगण्यात आले.
या विशिष्ट अशा उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या संधीचा लाभ ७ वी ते १२ वीच्या तरुण विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक विराफ पेसूना, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल शर्मा व युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया यांनी केले आहे.