मोठी घोषणा… आता सर्व सरकारी शाळांमध्ये बसवणार CCTV कॅमेरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. एक वर्षात टप्पा-टप्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त तिथे प्राधान्याने अगोदर कॅमेरे लावले जाणार आहेत.

तसेच यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात जिल्हा परिषदेच्या ६५ हजार शाळा आहेत. त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे. नुसते कॅमेरा लावून चालणार नाही. काल पुण्यातील एका शाळेत एका नराधमाने प्रवेश करून एका चिमुकलीला जबदस्ती करून बाथरूमध्ये घेवून जात बलात्कार केला. या शाळेत कॅमेरा होते मात्र हार्ड डिस्क नव्हती. तसेच खासगी शाळांमध्ये वर्ष सुरू होण्यापूर्वी सीसीटीव्ही लावण्यास सांगितले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.