यावल तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद झाल्याने गोंधळ

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी २०२२ साठी ई केवायसीसाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असल्याने सर्व आधार केंद्रांवर वयोवृद्ध शेतकरी बांधव तसेच वयोवृद्ध महिला मंडळीची धावपळ सुरु होती. कारण ई केवायसीसाठी शासनाने ३१ मार्च ही शेवटची तारीख दिल्याने नागरिक आपआपल्या परीने जवळच्या आधार केंद्रांत जाऊन आधारशी मोबाईल नंबर लिंक करत होते.

मात्र शुक्रवारी सकाळी लोकांनी आधार लिंकसाठी नंबर लावून बसले असता १० वाजता त्यांना सांगण्यात आले की, आधार कार्डच्या मुख्य कार्यालयातून आमचे सर्वर बंद करण्यात आले आहे. त्यावर तालुक्यातील सर्वच ठिकाणी आधार मशिन बंद करण्यात आल्याने लोकांची चांगलीच पळापळ होत आहे.

एकीकडे ३१ मार्च ही अखेरची तारीख दिली तर दुसरीकडे आधार केंद्र बंद असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शेतकरी राजाला आसामानी संकटामुळे वारंवार अडचणीना सामोरे जावे लागते त्यात शासनाकडून तुटपुंजी मदत योजनेमार्फत मिळते खरी मात्र अशा अडचणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यावर तात्काळ मार्ग काढून तालुक्यातील सर्व आधार केंद्र सुरू करण्यात यावे, याकडे जिल्हाधिकारी जळगाव, यावल तहसिलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन समस्या सोडवावी अशा व्यथा प्रसार माध्यामाकडे आधार केद्र चालकांनी मांडल्या आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोनवर्ष आधार कार्ड केंद्र बंद होती. गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाच्या सर्व नियम अटी मान्य करून बँक गॅरेंटी विविध प्रमाणपत्रे सादर करून आधार केंद्र सुरू झाले मात्र त्यातही एकीकडे केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे आधार केंद्र चालकांना विविध अडचणी तांत्रिक बांबीना सामोरे जावे लागते त्यात एका छोट्याशाचुकीसाठी आधार ऑपरेटर ब्लॅक लिस्ट होणे असे प्रकार घडत असतात.

तसेच नकळत झालेल्या चुकांमुळे विविध प्रकारचा दंड भरावा लागतो, त्यामुळे सर्व लिगल काम करूनही लोकांची शिवी दमदाटी बोलणी ऐकुन ही आम्ही लोकांना सर्व प्रकारे सेवा देत असतो, सेवा देऊनही जेव्हा शासनाला पटेल तेव्हा केंद्र बंद करून आम्हालाही विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आधार ऑपरेटर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.