जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलची नवीन उपलब्धी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टद्वारे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व थरातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तसेच “संकल्प स्वास्थ्य सुरक्षेचा हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थेने काही वर्षांपूर्वी जळगाव शहर महानगरपालिकेचे राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचे संपूर्ण नूतनीकरण करून त्याचे मल्टीम्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले.

तसेच येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी, याबरोबरच अद्ययावत आधुनिक मशिनरी व ऑपरेशन थिएटरद्वारे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याठिकाणी पूर्णवेळ एम.डी. फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, नाक कान घसा इतर तज्ञ डॉक्टर्स नियुक्त आहेत. रुग्णसेवेच्या संदर्भात अत्याधुनिक साधनसामग्री, तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स सोबत आपुलकीची रुग्णसेवा यामुळे अल्पावधीत राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल असंख्य रुग्णांसाठी आज आशास्थान बनले आहे.

उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची आणखी एक पायरी वर चढत राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी व कुशल डॉक्टरांच्या सहकार्याने स्वतंत्र हृदयरोग विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यात नामंकित कंपनीचे आधुनिक कॅथलॅब मशीन द्वारा या हृदयरोग (कॅथलॅब) विभागात कार्डियाक कन्सल्टेशन, ईसीजी, 2-डी इको (कार्डीओग्राफी), अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, डायटिक कौन्सिलिंग, पेसमेकर, एटोटिक, आणि मीट्रल बलून, वल्वप्लास्टी इत्यादी स्वरूपाच्या सेवा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे शासकीय योजनांतर्गत पात्र असलेल्या सर्व रुग्णांना या कॅथलॅबचा मोफत लाभ घेता येणार आहे. सदर हॉस्पिटलमध्ये शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना इत्यादी योजना लागू करण्यात आलेल्या असुन, इतर इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे.

तरी गरजू रुग्णांनी सर्व योजनांचा आणि हॉस्पिटलमधील आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे तसेच पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व इतर सर्व विश्वस्तांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.