शेअर बाजारात विक्रम ! सेन्सेक्स 70 हजारांच्या पार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शेअर बाजारात आज विक्रम झाला आहे. सेन्सेक्सने 70 हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. आज आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी आज शेअर बाजारात किंचित वाढ होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स आज 69,925.63 च्या पातळीवर उघडला; पण काही काळानंतर तो 70,000 चा आकडा पार केला. यासह सेन्सेक्सने नवा विक्रम केला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 70000 चा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्सचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. stनिफ्टी 21000 च्या समीप व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे.

गेल्या आठवड्यात बी 30 शेअर्सचा सेन्सेक्स 2,344.41 अंकांनी किंवा 3.47 टक्क्यांनी वाढला. तर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्स 303.91 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 69,825.60 अंकांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. तर NSE निफ्टी 50 ने 0.24% वाढून 21,019.80 चा ताज्या उच्चांक गाठला हाोेता.

‘हे’ शेअर्स आघाडीवर

सोमवारी सुरुवातीच्‍या व्‍यवहारात कोल इंडिया, ओएनजीसी, इंडसइंड बँक, यूपीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट NSE निफ्टी 50 वर नफ्यात आघाडीवर राहिले. तर सेन्सेक्सने 223.30 अंकांची उसळी घेत सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात 70,048.90 च्या विक्रमी उच्चांक गाठला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.