कनिराम परदेशी यांना राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव – पैठण येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात तालुका सरकारी पेन्शनर्स संघ तर्फे आयोजित राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार 2021-22 या सोहळ्यात भडगाव येथिल निवृत्त मुख्याध्यापक कनिराम बुधा परदेशी यांना देण्यात आला .
निवृत्ती नंतर सेवा निवृत्ती संघटनेच्या कामात सहभागी होऊन निवृत्ताना संघटनेचे महत्त्व पटऊन दिले. अनेक सभासद होण्यास प्रवृत्त केले व संघटनेस बळकटी आणली असे कार्य करत असताना अन्य समाजसेवा साठी सक्रिय भाग घेतला . सेवे दरम्यान व नंतर ही तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. दोघे मुले महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावत आहे. परिवार व सामाजिक प्रपंचचा गाडा उत्कृष्ट पणे ओढणाऱ्या कनिराम परदेशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे अध्यक्ष श्री एन.डी.मारणे यांच्या हस्ते पैठण येथे हा राज्यस्तरिय पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. परदेशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.