लोकशाही न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर – प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत चोपडा, यावल, रावेर, भुसावळ व जामनेर तालुका अंतर्गत ग्रामीण भागातील ४९ किमीचे एकूण ८ रस्ते दर्जोन्नत करणेसाठी खा रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी ३६.७६ कोटी निधीस मंजुरी मिळालेली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत मंजुरी मिळालेल्या रस्त्यामध्ये चोपडा तालुक्यातील तीन रस्त्यासाठी १७ किमी रस्त्यासाठी १२.७९ कोटी, यावल तालुक्यात ७.२२ किमीच्या एक रस्त्यासाठी ५.६० कोटी, रावेर तालुक्यात ६ किमीच्या एक रस्त्यासाठी ४.७२ कोटी, भुसावळ तालुक्यात ५.४६ किमीच्या एक रस्त्यासाठी ३.५४ कोटी आणि जामनेर तालुक्यातील १२.७३ किमीच्या दोन रस्त्यासाठी १०.४२ कोटी निधीस यावेळी मंजुरी मिळालेली असून, सदर कामे लवकरात लवकर सुरु होणार आहे. अशी माहिती खासदार संपर्क कार्यलय, मुक्ताईनगर यांचेकडून देण्यात आली आहे.


