जळगाव लोकसभा मतदारसंघात नवीन रस्त्यासाठी 70 कोटीचा निधी – खा. उन्मेश पाटील

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघातील खा. उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथील खासदार कार्यालयांमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या भक्कम अशा पाठपुराव्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध नवीन नऊ रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राज्यातील सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघात आल्याने रस्ता जोड प्रकल्प म्हणून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे असे सांगितले,
याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,पंतप्रधान ग्राम सडक योजना फेस थ्री अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या विविध रस्त्यांसाठी शेकडो कोटीचा निधी मंजूर झाला असून महत्त्वाचे म्हणजे आपल्या मतदारसंघात 70 किलोमीटर रस्ते नव्याने होणार असल्याने जिल्ह्यातील प्रामुख्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील दळणवळणासाठी मोठा हातभार लागणार असून नागरिकांना व शेतकऱ्यांना यामुळे आपल्या शेतीमालाची इतर बाजारपेठ मध्ये ने आण करण्यासाठी सुखकर अशी योजना असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या योजनेपासून मोठा दिलासा मिळणार असल्याने ,जनता व शेतकरी खा. उन्मेश पाटील यांच्या भक्कम अशा पाठपुराव्यामुळे हे रस्त्यांसाठी निधी मिळाल्याने खा. उन्मेश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,
या रस्त्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी 22 कोटीचा निधी मिळाला असून उर्वरित निधी हा भडगाव पाचोरा पारोळा अंमळनेर एरंडोल या तालुक्यांसाठी प्राप्त झाला आहे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी हिरापूर अंधारी तमगव्हाण असा मोठमोठी गावांना जोडणारा 16 किलोमीटरच्या रस्त्यास मंजुरी मिळाली आहे ,त्याचप्रमाणे पातोंडा वाघडू रांजणगाव ते नॅशनल हायवे असा अकरा किलोमीटर चा रस्त्यास मंजुरी मिळाली आहे यामुळे पाचोरा कडून चाळीसगाव शहरात येणारी वाहने बायपासने जाऊ शकतात असा महत्त्वकांक्षी रस्त्यास मंजुरी मिळाली आहे,
त्याचप्रमाणे मतदारसंघातील मारवाड, जैतपूर, सहा किलोमीटर ,मुडी बोदरडे भरवस चौबारी ,नऊ किलोमीटर, गिरड ते तळई तालुका हद्यपर्यंत, कासोदा ते गालापूर सात किलोमीटर, शेवरे पुंनगाव ते शेवरे बुद्रुक कंकराज रत्न पिंपरी सहा किलोमीटर ,पासर्डी ते गोंडगाव घुसर्डी रोड नऊ किलोमीटर, ममुराबाद ते नांद्रा खुर्द कडे जाणारा पाच किलोमीटर ,अशा प्रकारे जिल्ह्यातील सुमारे 70 किलो मीटर विविध नऊ रस्त्यांसाठी 70 कोटीचा निधी मंजूर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे असे खा. उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.