लोकशाही न्यूज नेटवर्क
अखिल भारत हिंदुमहासभा प्रांतिक अधिवेशन १५ जानेवारी रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल बहुद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे.
यावेळी १० ते १२ यावेळेत प्रांतिक कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दुपारी ३ ते ४ यावेळेत हिंदू महासभा महिला आघाडीतर्फे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष अँड. गोविंद तिवारी , माजी प्रदेशाध्यक्ष अनुपम केणी , प्रमुख कार्यवाह दत्ताजी सणस ,अधिवक्ता सतीश देशपांडे, राष्ट्रीय प्रवक्ता दिनेश भोगले, आदी प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहे.
सहकार्यवाह देविदास भडंगर ,जिल्हाध्यक्ष रमेश सुशील,संघटक नारायण अग्रवाल,वैद्यकीय अध्यक्ष डॉ. रमाकांत कदम, जिल्हा संघटक प्रकाश क्षीरसागर , जिल्हा उपाध्यक्ष विकास पाटील आदींनी केले आहे.