राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित द्वितीय “राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा दि.20 ला दोंडाईचा येथे उत्साहात संपन्न झाला. जळगांव जिल्ह्यातून अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मिलींद प्रभाकर पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक क्रीडा पत्रकार पुरस्कार तर धरणगाव येथील सारजाई कुडे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सचिन लोटन सुर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक व क्रीडाशिक्षक क्रीडापत्रकारिता राज्यातून दोन असे एकूण ३७ पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार्थी काकासाहेब पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे राज्य क्रीडासंचालक चंद्रकांत कांबळे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक देविदास गोरे, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून फिजिकल टीचर एज्युकेशनचे राज्य अध्यक्ष डॉ. बलवंत सिंग, हस्ती उद्योग समूहाचे अशोक जैन, कैलास जैन, धुळे जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे, राष्ट्रीय प्रो कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक आयोजक तथा राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश व आयोजना मागची भूमिका राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केली. यावेळी कैलास जैन, किशोर जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा संचालक चंद्रकांत कांबळे , औद्योगिक सुरक्षा विभागाचे सह संचालक देविदास गोरे, जेष्ठ ऑलिम्पिक खेळाडू कुस्तीपटू काकासाहेब पवार यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, सुनिल वाघ, गिरीश पाटील, डॉ. रणजित पाटील, प्रा. इकबाल मिर्झा, धुळे जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डी बी साळुंखे, नंदुरबार जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, पंकज पाठक इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.
राज्य युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. मयूर ठाकरे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.