पाचोरा शहरात काॅंग्रेसचा विविध मागण्यांसाठी शिंगाडा मोर्चा

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहर व तालुका काॅंग्रेसतर्फे दि. २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसंदर्भात भव्य असा शिंगाडा मोर्चा काढला आला.

या मोर्चात शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, ओ. बी. सी. सेल चे तालुका अध्यक्ष शेख इरफान शेख इक्बाल मणियार, शेख इस्माईल शेख फकीरा, राजु महाजन (पिंपळगाव हरेश्र्वर), अॅड. वासिम बागवान, शेख शरिफ (वेंडर), शंकर सोनवणे, प्रदिप चौधरी, अॅड. मनिषा पवार, संगिता नेवे, कल्पेश येवले, राहुल शिंदे सह मोठ्या संख्येने शहर व तालुक्यातील बंधु, भगिनी उपस्थित होते.

पाचोरा शहरातील माहे जानेवारी – २०२२ चे मोफत स्वस्त धान्य तात्काळ मिळावे, शहरातील दारिद्र्य रेषेखालील बी. पी. एल. धारक २ हजार २०० कुटुंबांना स्वस्त धान्य व इतर सवलती मिळाव्यात, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व्यक्ती यांचा बी. पी. एल. मध्ये समावेश करण्यात यावा, स्वस्त धान्य दुकान महिन्याच्या सर्व दिवस खुले ठेवण्यात यावे, भिल्ल, तडवी, आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीची जागा तात्काळ नावावर लावणे, ग्राम पंचायत व नगर पालिका मधील ५ टक्के निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी दि. २१ रोजी शहरातील आठवडे बाजार येथुन बैलगाडी वर बसुन शिंगाडा मोर्चा काढला.

सदरचा मोर्चा आठवडे बाजार – गांधी चौक – जामनेर रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट तहसिल कार्यालयावर धडकला. यावेळी सचिन सोमवंशी यांना शहरातुन उत्स्फूर्त असा मिळाला. यावेळी तहसिल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राजु महाजन, शेख इस्माईल शेख फकीरा यांनी उपस्थितांना मोर्चा काढण्यामागील उद्देश समजावुन सांगितला.

याप्रसंगी तहसिलदार कैलास चावडे यांनी भेट देवुन सदरच्या मागण्या त्या – त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर सोडविण्यात येतील अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चा थांबविण्यात आला. या मोर्चास प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, पाचोरा तालुका सह विविध सामाजिक संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.