सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला दणका, काय आहे प्रकरण ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुप्रीम कोर्टाने आज स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत  दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

तसेच स्टेट बँकेची याचिका फेटाळली असून निवडणूक रोख्यांची माहिती उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला उपलब्ध करून द्या आणि निवडणूक आयोगाने 15 मार्चपर्यंत वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दरम्यान स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी आपल्याला जून महिन्यापर्यंत मुदत द्यावी, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे.

“आम्ही 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते. तुम्ही 26 दिवस काय केले?” असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले. यावर स्टेट बँकेने तीन आठवड्यात माहिती देतो, असा दावा केला. पण त्यानंतरही न्यायलयाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढत, ही माहिती तात्काळ देण्याचे आणि आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.