स्टार्टअपचे प्रकार किती व कोणते?…

0

लोकशाही विशेष लेख

गेल्या भागात आपण डीआयपीपी (DIPP) किंवा डीपीआयआयटी (DPIIT) मध्ये स्टार्टअप रजिस्ट्रेशनचे काय महत्त्व आहे, या संदर्भात माहिती जाणून घेतली. आज आपण एक नव्या संकल्पनेला जाणून घेऊ ती म्हणजे, “स्टार्टअपचं (startup) रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तो स्टार्टअप की स्टार्टअप निर्माण केल्यानंतर त्यातून इन्कम मिळू लागलं म्हणजे स्टार्टअप होतो!” या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. चला तर जाणून घेऊया याचं उत्तर.. समजा तुम्हाला एखादी कल्पना सुचली.. तुम्हाला काळ्या रंगाचे टोमॅटो निर्माण करायचे आहेत. ही झाली तुमची नवी संकल्पना. ही संकल्पना आपण रजिस्टर केली म्हणजे तो स्टार्टअप होतो का? तर नाही.. जोपर्यंत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीमध्ये येत नाही किंवा त्यातून तुम्ही काही योग्य ते उत्पन्न किंवा नफा कमवू शकत नाही, तोपर्यंत त्याला स्टार्टअप म्हणता येणार नाही.

वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना निर्माण होत असतात. जसे की, संरक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन आयडिया येतात, कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रक्रिया निर्माण होतात, अशा बऱ्याच घटकांमध्ये नवनवीन संकल्पना निर्माण होतात. पण जोपर्यंत या संकल्पना प्रत्यक्षात अमलात येऊन त्यावर योग्य ती विश्वासार्हता निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याला स्टार्टअप म्हणता येणार नाही. मुळात रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी ही या प्रक्रियेतील पाचवी किंवा सहावी पायरी आहे. ज्यामध्ये स्टार्टअपची फक्त नोंदणी होत असते. उदाहरण घ्यायचं झाल्यास बाळ जन्माला आलं की, आपण त्याची जन्म नोंदणी करतो. मात्र तो जोपर्यंत व्यवस्थित शिकून सावरून मोठा होत नाही, पुढे जाऊन कमावता होत नाही तोपर्यंत त्याला आपण सक्षम नागरिक म्हणून ओळखू शकत नाही. हे अगदी तसंच आहे. फक्त नोंदणी केली म्हणजे तो स्टार्टअप होत नाही, तर त्याला योग्य त्या प्रमाणात अमलात आणून, त्यातून योग्य ते फायदे मिळणे गरजेचे आहे.
तुमच्याकडे असलेल्या स्टार्टअप च्या संकल्पनेची सहा भागांमध्ये विभागणी होत असते. म्हणजे स्टार्टअपचे सहा प्रकार पडतात.

१) लाइफस्टाइल स्टार्टअप
या स्टार्टअप प्रकारात खाद्यपदार्थ आणि कपडे यांसारख्या लाइफस्टाईल प्रकारातील स्टार्टअपचा समावेश होतो. याची बाजारपेठेतील मागणी आणि या प्रकाराचा ग्राहक हा वेगळा असतो. कपडे परिधान करणारे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात. खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आढळून येतात. साउथ मध्ये वेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते, नॉर्थमध्ये वेगळ्या प्रकारचे वापरले जाते असे अनेक बदल आढळून येतात. त्यामुळे हा एक संशोधनाचा देखील भाग म्हटला जातो. ज्या भागात स्टार्टअप सुरू करायचा आहे त्या भागात कशा प्रकारची लाइफस्टाइल आहे, त्यानुसार स्टार्टअपची निर्मिती होते.

२) स्मॉल स्टार्टअप
स्मॉल स्टार्टअप हा छोटेखानी स्टार्टअप प्रकार म्हणता येईल. या प्रकारात छोट्या पद्धतीने सुरु करण्यात आलेल्या स्टार्टअप प्रकारांचा समावेश होतो. या लहान बिजनेसला मोठा करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.

३) स्केलेबल स्टार्टअप
तिसरा प्रकार येतो स्केलेबल स्टार्टअप. हा स्टार्टअप म्हणजे मोठ्या प्रकारातला स्टार्टअप आहे. उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप या प्रकारचे मोठे स्टार्टअप या प्रकारात मोडतात.

४) बायेबल स्टार्टअप
हा प्रकार जरा वेगळा ठाटणीतला स्टार्टअप प्रकार आहे. स्टार्टअप सुरु करण्याचे दोन प्रकार असतात. एक तर तुम्ही स्वतः स्टार्टअप सुरू करू शकतात किंवा दुसरा म्हणजे सुरू असलेला स्टार्टअप जो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याला तुम्ही विकत घेऊन पुढे चालवू शकतात. याचं सर्वात मोठा उदाहरण म्हणजे हेलन मस्कने विकत घेतलेले ट्विटर.

५) लार्ज कंपनी स्टार्टअप
पाचवा प्रकार येतो लार्ज कंपनी स्टार्टअप. मोठ्या प्रकारचा स्टार्टअप यात सामावलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास नायका, मी शो.. हे लार्ज प्रकारातील स्टार्टअप आहेट, जे आता फार मोठे झाले आहेत.

६) सोशल स्टार्टअप
सहावा येतो सोशल स्टार्टअप. यामध्ये सामाजिक प्रकारातील स्टार्टअपची निर्मिती होते. उदाहरणार्थ घनकचऱ्यापासून किंवा वेस्टेज पासून काहीतरी निर्माण करण्याचा स्टार्टअप. जेणेकरून याचा समाजाला काही ना काही फायदा होईल.
(क्रमशः)

पंकज दारा
ग्लोबल स्टार्ट अप मेंटॉर
9823354105
[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.