अवैध दारूची विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा

0

जळगाव ;- विना परवाना अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ७०० रुपयांच्या देशी टॅंगो दारूच्या बाटल्या आणि एक सुरा हस्तगत करण्यात आला आहे . आरोपी संतोष सुभाष राऊत वय २४ रा. आयटीआय जवळ कुसुंबा जळगाव हा १० जून रोजी औरंगाबाद रस्त्यावर रायपूर फाट्यानजीक मोकळ्या जागी अवैध देशी दारू विक्री करताना आढळून आला . त्याच्यावर मुंबई अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल कारणात आला आहे .तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहे . एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.