1 जानेवारी 2024 पासून अनेक नियम बदलणार!

0

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी काही बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेचा रणसंग्राम पण 2024 मध्ये होतील. याशिवाय सिम कार्ड आणि GST सह अनेक बदलांची नांदी आहे. एकूणच 1 जानेवारी 2024 पासून अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

UPI डिएक्टिव्हिट होईल – 1 जानेवारीपासून 1 वर्षांपासून बंद असलेली UPI खाती बंद होतील. बँका, पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखी थर्ड पार्टी एप्स पण 1 जानेवारीपासून युपीआय आयडी इनएक्टिव्ह होतील. ज्या युपीआय आयडीवर एक वर्षापासून कोणताच व्यवहार झाला नाही, ती खाती बंद होतील.

सिम कार्डचे बदलले नियम – 1 जानेवारीपासून सिम खरेदीसाठी नियमात बदल होईल. त्यासाठी डिजिटल KYC करणे अनिवार्य आहे. दूरसंचार विभागाने कागदोपत्री केवायसी करणे बंद केल्याने ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी लागेल.

ITR फायलिंग – 1 जानेवारीपासून ITR फायलिंगसाठी दंड द्यावा लागू शकतो. 31 डिसेंबर रोजी बिलेटेड ITR रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास 1 जानेवारीपासून त्यावर दंड आकारल्या जाईल.

डीमॅट खात्यात वारसदार – म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात वारसाचे नाव जोडावे लागणार आहे. त्यासाठीची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता ही मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गॅस सिलेंडरचा भाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचा भाव निश्चित करण्यात येतो. अशावेळी वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना पहिल्या दिवशी खिसा कापला जाणार की बचत होणार हे कळते.

वाहन होणार महाग – 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार किंमतीत वाढ होईल. कंपन्यांनी त्यांची अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आलिशान कारचा पण यात समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.