तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

0

चोपडा | प्रतिनिधी 

29 डिसेंबरच्या मध्यरात्री चोपड्या तालुक्यातील कुरवेल गावातील रहिवासी हिम्मत पितांबर कोळी यांच्या राहत्या घराच्या बाजूला शेळीच्या गोठ्यात घुसून तळसाने चार शेळ्यांची शिकार केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे  कुरवेल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी शेळींना चारापाणी करण्यासाठी गोठा उघडल्यावर ही बाब लक्षात येताच फॉरेस्ट अधिकारी खलील शेख यांना बोलवण्यात आले त्यांनी तपास केला असता ही शिकार तळसाने केली आहे ही बाब लक्षात आली तसेच घडलेल्या घटनेचा पंचनामा कुरवेल गावातील पोलीस पाटील माहिती अधिकार संघटने चे चोपडा तालुका उपाध्यक्ष व  इतर ग्रामस्थांसमोर करण्यात आला सदर नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी कायदेशीर तक्रार दाखल करण्याचेही खलील शेख यांनी सांगितले तसेच कुरवेल ग्रामस्थांना सावधान रहाण्याच्या इशारा फॉरेस्ट खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.