लोकशाही न्यूज नेटवर्क
सातारा
कराड ; गांजाची वाहतूक करणार्यासख्या भावंडाना अटक. गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणार्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली. खोडशी (ता. कराड) येथे कराड पोलीस उपाधिक्षक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. 43 हजार 560 रूपयांचा आठ किलो 900 ग्रम गांजासह चारचाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे.
एकनाथ सदाशिव चव्हाण (वय 37) व बापू सदाशिव चव्हाण (22, दोघे, रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बीड परिसरातून आणलेल्या गांजाची वाहतुक एका कारमधून सुरू आहे. तो गांजा कराड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिले.
त्यानुसार कराड शहर व पोलिस उपाक्षीक कार्यालय अशी दोन पथके तयार करून खोडशी परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान, महामार्गावरून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कार आल्याचे दिसताच पोलीस पथकाने ती कार थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्या कारमध्ये गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्या कारसहीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.