उन्हाळ्यातील सर्वात उत्तम पेय माठातले पाणी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हळू हळू सगळी कडे उन्हाच्या झळा बसायला लागल्यात अशा गर्मीत सर्वचजण शरीराला थंडावा मिळावा आणि कोरड्या पडलेल्या घशाला आराम मिळावा म्हणून,विविध प्रयत्न करताना दिसत आहेत.वेळेप्रसंगी फ्रिजमधील पाणी पिऊन ते आपला त्रास मिटवत आहेत.पण तुम्हाला माहित आहे का? फ्रिजमधील पाणी हे शरीराला घातक असते.

माठातील पाणी अनेक रोगांशी लढण्यात फायदेशीर ठरते . माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली.परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे.लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते.

मातीचे गुणधर्म:

माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन:

शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

पाणी थंड करण्याची नैसर्गिक पद्धत

पर्यावरणास कोणतीही हानी न पोहचवता पाणी मातीच्या माठात भरुन अगदी नैसर्गिकरित्या थंडगार केलं जाऊ शकतं. मातीपासून बनलेल्या माठांमध्ये असे काही विशेष गुणधर्म असतात की ते माठ पाणी भरल्यानंतर काहीच वेळाच त्यावर काही खास प्रक्रिया करण्यास सुरुवात करतात आणि त्यामधील पाणी थंडगार होते. तसेच यामुळे आपल्या आरोग्यालाही कोणत्याही प्रकारचा धोकाही होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.