दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावी (SSC) बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही.

21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. मात्र आता राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मंडळाने या संदर्भातील पत्र देखील सर्व शाळांना पाठवले आहे.

उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. याची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. परंतु या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत हजर राहणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.