सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या ९ उमेदवारांचा विजय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधरांमधून निवडून देण्याच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा दहापैकी नऊ जागांवर दणदणीत विजय झाला. यात राखीव संवर्गातून पाच तर खुल्या संवर्गातून ५ पैकी ४ असे दहा पैकी नऊ उमेदवार विद्यापीठ विकास मंचचे निवडून आले.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गातून दिनेश चव्हाण, महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन, इतर मागास संवर्गातून नितीन झाल्टे, अनुसूचित जाती संवर्गातून दिनेश खरात तर खुल्या संवर्गातील अमोल नाना पाटील, अमोल मराठे, अमोल सोनवणे, सुनील निकम आणि विष्णु भंगाळे विजयी झाले आहेत.

रविवार, २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकूण सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. १० जागांसाठी २७ उम्मेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत खुल्या संवर्गात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संवर्गात एका जागेसाठी ३ उम्मेदवार, अनुसूचित जाती संवर्गात एका जागेसाठी ४ उमेदवार अनुसूचित जमाती संवर्गात एका जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात एका जागेसाठी ३ उमेदवार आणि महिला संवर्गात एका जागेसाठी ४ उमेदवार उभे होते. एकूण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ११ हजार १४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.