फुले मार्केट दुकानदार ,हॉकर्स वाद ; मार्केट बंदचा निर्णय

0

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील सर्वात गजबजलेले मार्केट म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा फुले मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय फुले मार्केट असोसिएशनने घेतला आहे.

हॉकर्स आणि फुले मार्केट दुकानदार यांच्यात अतिक्रमण आणि जागेवरून नेहमी वाद उदभवत असून आज सकाळी फुले मार्केट असोशिएशनतर्फे हॉकर्स चा होणारा त्रास लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून त्यांना निवेदन दिले असून महापालिकेत आयुक्तांना या समस्यांबाबत भेटून निवेदन देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

आज दुपारी अचानक महात्मा फुले मार्केट बंद झाल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले . फुले मार्केट बंद असल्याने विविध तर्क वितर्काना उधाण आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.