“श्रीदेवी-द लाइफ ऑफ ए लेजेंड” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

२०१८ साली श्रीदेवी (Sridevi) यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण विश्वाला धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या अशाप्रकारे जाण्याने चाहत्यांसोबत चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला. अप्रतिम कारर्किद आणि आपल्या सौंदर्याने श्रीदेवीने अनेक वर्ष चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतच आता बोनी कपूर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बोनी कपूर (Boney Kapoor) हे श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करणार आहेत. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्यांची दिवंगत पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बायोपिकची घोषणा ‘श्रीदेवी – द लाइफ ऑफ ए लेजेंड’ या नावाने केली आहे. बोनी कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

बोनी कपूर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत द लाइफ ऑफ ए लेजें या बायोपिकची घोषणा केली आहे. धीरज कुमार यांनी हे पुस्तक लिहिले असून श्रीदेवी त्यांना आपल्या कुटुंबियांपैकी एक मानत होत्या. श्रीदेवी – द लाइफ ऑफ ए लेजेंड या पुस्तकावर अजूनही काम सुरू असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.