जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील चित्रकार मीनल महेश झंवर यांच्या ३५ चित्रांचे प्रदर्शन पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या कला दालनात दि.१४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस महेश झंवर, वीणा मंडोरे, रोटरी गोल्डसिटीचे माजी अध्यक्ष संजय दहाड, फॅशन डिझायनर रचना मंत्री, प्रा. ममता दहाड यांची उपस्थिती होती.
मीनल झंवर या गृहिणी असून त्यांचे बी.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. लग्नानंतर १० वर्षांनी त्यांनी तरुण भाटे यांच्या मार्गदर्शनात हा धंद जोपासला आहे. त्या कवियत्री देखील असून मराठी, हिंदी भाषेत त्यांनी कविता केल्या आहेत. झंवर यांचे हे तिसरे चित्र प्रदर्शन असून यापूर्वी जळगाव व अकोला येथे त्यांची प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती.
या प्रदर्शनात मीनल झंवर यांनी विविध प्रकारची चित्रे साकारली आहे. रसिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवार सोडून गुरुवारपासून सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.