जबलपूर शहरात तंदुरी रोटीवर बंदी ? ; जाणून घ्या काय आहे कारण

0

जबलपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशातील जबलपूर शहर सध्या चर्चेत आहे. इथे खायला तंदुरी रोटी मिळणार पासून जिल्हा प्रशासनाने भट्टीवर तंदुरी रोटी बनविण्यास बंदी घातली आहे. तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हा आदेश येताच हॉटेल मालकांमध्ये खळबळ उडाली असून तंदुरी रोटी खाणाऱ्या ग्राहकांनाधक्का बसला आहे. त्याचबरोबर आदेशाचे पालन न करणाऱ्या हॉटेलमालकांवर लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत हॉटेल मालकांना मोठा धक्का बसला आहे.

जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील 50 हॉटेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाद्वारे तंदूर वापरणे बंद करण्यास सांगितले आहे. त्याऐवजी इलेक्ट्रिक किंवा एलपीजी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.