श्रीराम रथोत्सवाला उद्यापासून वहनोत्सवाने सुरुवात… यंदाचे १५० वे वर्ष

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्री राम मंदिर संस्थांचे मूळ सत्पुरुष व कान्हदेशातील सद्गुरु आप्पा महाराजांनी प्रारंभ केलेला कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी निमित्त यंदाही श्रीराम रथोत्सव संपन्न होणार आहे. तत्पूर्वी उद्या दि 26 ऑक्टोबर पासून श्रीराम वहनोत्सवाला प्रारंभ होत असून या उत्सवातील पहिले वहन घोडा हे असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता श्रीराम मंदिराच्या प्रांगणात संस्थेचे प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती वही वाटदार व श्री संत आप्पा महाराज यांचे पाचवे वंशज हरिभक्त परायण श्री मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते वंशपरंपरेनुसार प्रथमवहन पूजा विधी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शहरातील समस्त ब्रह्मरुंद मंडळाचे वेद घोष मंत्रोच्चाराने विधिवत पूजा होईल. यावेळी संस्थांचे सर्व सन्माननीय विश्वस्त श्रीराम विश्वस्त भरत अमळकर, भालचंद्र पाटील, एडवोकेट सुशील अत्रे, शिवाजी भोईटे, दादा नेवे, विवेक पुंडे, समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, अर्थोत्सवाचे मानकरी, मोगरी वाले, सेवेकरी व शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रथम वाहन पूजन प्रसंगी आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, जळगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, रामानंद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे, जळगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, जळगाव शहर बाजार शाखा जळगाव पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक अरुण नलावडे, सामाजिक कार्यकर्ते अमित भाटिया, पियुष कोल्हे, ललित चौधरी, कमलाकर बनसोडे, सचिन नारळे, मोहन तिवारी, आकाश फडे, प्रशांत जुवेकर, कवी कासार, किशोर सूर्यवंशी आदी उपस्थित राहतील.

वाहन मिरवणुकीस संध्याकाळी सात वाजेला प्रारंभ होणार असून मिरवणूक श्रीराम मंदिरापासून भोईटे गढी, कोल्हे वाडा, चौधरी वाडा, तेली चौक, श्रीराम मंदिराची मागची गल्ली, रथ चौक, सराफ बाजार मार्गे भवानी मंदिर येथे भजन भारुड, प्रभू श्रीरामांच्या घोड्यावर विराजमान झालेल्या मूर्तीची महाआरती होऊन पानसुपारी कार्यक्रम होईल. वहन तेथून सुभाष चौकात सुभाष चौक पतसंस्थेचे विद्यमान वहन पानसुपारी भजन, भारुड, आरती होऊन वहन गांधी मार्केट भिलपुरा मार्गे बालाजी मंदिर तेथे आरती होईल. वहन रथ चौक मार्गे श्रीराम मंदिरात येईल. आरती होऊन श्रीफळ प्रसाद उपस्थित भक्तांना देण्यात येईल. यंदाचे हे 150 वे वर्ष असून वहनोत्सव व रथोत्सव यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.