हिंमत असल्यास एकनाथराव खडसेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – संजय पवार

0

जळगावः – माजीमंत्री, आ. एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण करत अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी वाढली. आज खडसे विधानपरिषद सदस्य आहेत. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे.

आज खडसे अजित पवार, मंत्री अनिल पाटलांवर आरोप करताहेत. खडसेंनी स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. नंतर अजित पवारांवर बोलावे असे आव्हान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) संजय पवार यांनी दिली आहे. माजी मंत्री खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती इच्छूक उमेदवार सुनेत्रा अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काही अनूदगार काढले होते. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अरविंद मानकरी, सीमा नेहते, रमेश पाटील, योगेश देसले, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.