एअर इंडियाच्या १८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ !

0

मुंबई :- स्वेच्छा निवृत्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या व नव्याने कौशल्य शिकण्यास उत्सुक नसलेल्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांना एअर इंडिया कंपनीने अलीकडेच नारळ दिला.

एअर इंडिया तोट्यात चाललेली असताना टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये विकत घेतली. तेव्हापासून देशातील विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या टाटा ग्रुपकडून एअर इंडियाचे बिझनेस मॉडेल सुव्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फिटमेंट प्रक्रियेचा एक भाग म्हणून नॉन-फ्लाइंग टास्कमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रता आणि संस्थात्मक आवश्यकतांवर आधारित जबाबदारी देण्यात आली होती. हे सर्व लोक स्वेच्छानिवृत्ती योजना आणि रि-स्किलिंगच्या संधींचा वापर करू शकले नाहीत, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. कर्मचाऱ्यांना कमी करण्याची प्रक्रिया काही आठवड्यांपासून असल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या कंपनीत एकूण १८ हजार कर्मचारी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.