लोकसभेतून खडसेंची माघार संशयास्पद – डॉ. सतिश पाटील

0

जळगावः – लोकसभा निवडणूकांसाठी रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आ. एकनाथ खडसेंची उमेदवारी जाहिर झाली होती. त्यांनी देखील वेळोवेळी लोकसभा निवडणूकीसाठी ईच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपाच्या रक्षा खडसेंच्या उमेदवारी जाहिर झाल्या नंतर एकनाथ खडसेंनी लोकसभा न लढण्याची घोषणा हे नियोजनबध्द झाल्याची चर्चा जनतेत सुरू झाली असुन हे दिल्लीलाच ठरले. आहे,

खडसे हे सुनेची निवडणूक सोपी करतील अशी चर्चा जनतेत आहे, माझ ही तस मत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी बोलतांना सांगितले. भाजपाने रावेर लोकसभा मतदार संघासाठी खा. रक्षा खडसे यांची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते यांनी प्रकृतीच्या कारणाने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. तसेच मुलगी रोहीणी खडसे देखील लोकसभा लढणार नाही असे सांगितल्यावर खडसेंच्या युटर्न नंतर आता राष्ट्रवादीत देखील नाराजीचा सुर उमटू लागल्याचे दिसुन येत आहे.

माध्यमांशी बोलतांना डॉ. सतिश पाटील म्हणाले की, भाजपाने त्रास दिला म्हणून खडसे राष्ट्रवादीत आले, शरद पवार  त्यांना अडचणीच्या काळात साथ देवून विधान परिषदेवर पाठविले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.