भारतीय वंशाच्या व्यक्तीला सिंगापूरमध्ये फाशी… गुन्हा नक्की काय?

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय वंशाच्या व्यक्तीला सिंगापूरमध्ये फाशी देण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार तंगाराजू सुपैय्याला २०१३ मध्ये एक किलो गांजा तस्करीला प्राधान्य देण्यासाठी दोषी ठरवलं गेलं होतं. सिंगापूरमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात अनेक कठोर नियम आहेत. तिथल्याच कायद्यानुसार तंगाराजूला फाशी देण्यात आली आहे. एक किलो अंमली पदार्थांची तस्करी करणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सुपैयाला जी फाशी देण्यात आली त्याचा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने विरोध केला आहे. या प्रकरणी ब्रिटिश अरबपती रिचर्ड ब्रेनसन यांनी ही विरोध केला आहे. ब्रेनसन मृत्यूदंडाचा विरोध करत आहेत. सुपैयाला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे ड्रग्ज नव्हते. तरीही त्याला फाशी का दिली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सिंगापूर गृहमंत्रलयाने या प्रकरणी हे सांगितलं की सुपैयाला १०१७ ग्राम गांजाची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. भारतीय वंशाच्या तंगराजू सुपैय्याने एक किलो गांजा सिंगापूरहून मलेशियाला पोहचवला होता. त्याला गांजासह अटक करण्यात आली नव्हती. मात्र या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

तंगाराजूने फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून दया याचिका केली होती. मात्र ही याचिका रद्द करण्यात आली आहे. बुधवारी तंगाराजूला फाशी केली आहे. सिंगापूरच्या मानवाधिकार कार्यकर्त्या कोकिला अन्नामलाई यांनी असं म्हटलं आहे की आमच्या राष्ट्रपतींनी तंगाराजूची दया याचिका रद्द केली आणि त्याला फाशी दिली आहे. या प्रकरणी सिंगापूर सरकारने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.